गोंदिया मध्ये २५ वर्षीय युवक तलावात बुडून मृत्यू…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील 25 वर्षीय नवल शिवचरण कनपुरिया या युवकाचा काल२१ नोव्हेंबर नवतलावात बुडून मृत्यू झाला. मृतक नवल कनपुरिया हा आपल्या घराजवळील धन्नालाल रामटेके यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत घराजवळील नवतलाव येथे सकाळी १० वाजे दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेला असता, नवल पाण्यामध्ये खोलवर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिवो:- नवल यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला असता, परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली.नवलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितले घटनास्थळावर पोलीस पोहचून सदर मृतदेहाच्या पंचनामा करून मृत्यू देह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले .घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार दिलीप कन्नमवार व कोसमे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here