अवैध देशीदारू सह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त,लाखांदूर पोलिस पथकाची कामगिरी…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

एका चारचाकी वाहनाने संध्याकाळच्या सुमारास देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून लाखांदूर पोलिस पथकाने केलेल्या कारवाईत अवैध देशी दारू सह सुमारे 25 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई मागील 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील शिवाजी विद्यालया नजीक मुख्य मार्गावर लाखांदूर पोलिस पथकाने केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आशिष पांडुरंग परशुरामकर(26)रा.पिन्पळगाव/को. असे आरोपीचे नाव असून संबंधित आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी आरोपी लाखांदूर येथील वस्तीतील प्रमुख मार्गाने मॉंटेरो गाडी क्रमांक एमएच 31 डी 2017 ने जवळपास 25 पेटी देशी दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार लाखांदूर चे ठाणेदार शिवाजी कदम यांनी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम व अमोल कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस पथक निर्माण करून सबंधित अवैध दारू वाहतूक करणारी गाडी येथील शिवाजी विद्यालया नजीक मुख्य मार्गावर पकडली.

यावेळी या गाडीमध्ये 65 हजार रुपये किमतीचे पंचवीस पेटी देशी दारू आढळून आली. त्यानुसार लाखांदूर पोलिसांनी आरोपीला अटक करताना वाहन किंमत व अवैध देशी दारू सह सुमारे 25 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई येथील ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे, पोलिस नायक नेवारे व पोलीस शिपाई सुभाष शहारे यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here