हिंगणघाट जळीतकांड – पीडित तरुणीचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांची संमती…तर भावाला सरकारी नोकरी देणार…गृहमंत्र्यांनी दिले आश्वासन…
नागपूर: हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेला शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पीडितेच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माझ्या मुलीला त्वरीत न्याय द्या. आरोपीला तात्काळ शिक्षा द्या. त्याला शिक्षा होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या वडिलांनी घेतली होती.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला व लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ‘माझ्या मुलीला ज्या वेदना झाल्या, त्याच वेदना त्या नराधमाला द्यायला हव्यात,’ अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

1 thought on “हिंगणघाट जळीतकांड – पीडित तरुणीचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांची संमती…तर भावाला सरकारी नोकरी देणार…गृहमंत्र्यांनी दिले आश्वासन…

  1. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा बळी
    समाजात स्वार्थीपणा वाढत चालला आहे. एका मुलीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धाडस एक मुलगा कसे काय करू शकते ?.कारण समाजातील लोक आपले काही वाकडे करू शकणार नाही यांची त्याला जाणीव असल्यामुळेच त्याने हे धाडस केले. अशा घटना घडल्यावर समाज त्या कुटुंबातील लोकांना योग्य शिक्षा करीत नाही म्हणून अशा घटना लक्षवेधी ठरत आहेत, या घटनेचा केवळ निषेध करून उपयोग नाही, समाजाने सामाजीक दृष्ट्या बहिष्कार टाकला पाहिजे

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.