नाभिक समाजातील पत्रकारांचा अमरावतीत झाला सन्मान…

मूर्तिजापूर,ता.९ : महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघाच्या वतीने कलादर्पण स्मरणिकेचे प्रकाशन व नाभिक समाजातील प्रतिभावंत पत्रकारांचा सत्कार अमरावतीच्या टाऊन हॉल मध्ये शनिवारी (ता.८) करण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.इश्वर नंदापुरे, कादंबरीकार भरत माने, भगवान चित्ते, गोपालकृष्ण मांडवकर तसेच सत्कारमूर्ती पत्रकार मंचावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि संत सेना महाराजांच्या प्रतिमा पूजनानंतर सोहळा सुरू झाला. नागपूरचे गोपाल कडुकार, विशाखा गणोरकर, चंद्रपूरचे दिनेश एकवनकर, अमरावतीचे प्रणय निर्वाण, रायगडचे महेंद्र माने, वर्धेच्या प्रणिता राजुरकर, अकोल्याचे उमेश अलोणे, गजानन शेळके, प्रा.अविनाश बेलाडकर व इतर पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, बालवृक्ष व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ.इश्वर नंदापुरे यांनी यावेळी बोलतांना नाभिक समाजाला मुळातच निसर्गनिर्मित सुंदरतेची आहे, त्यातूनच समाजाचे साहित्यसंमेलन संपन्न झाल्याचे गौरवोद्गार काढले. पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी प्रतिभा सर्वांच्या ठायी आहे, ती तुम्ही-आम्ही ओळखली पाहिजे. आज समाजातील झरे आटलेले आहेत. पूर्वी विहिरीतून पाणी काढायचे, आता विहिरीत पाणी टाकावे लागत आहे. तद्वतच समाजातील विचारांचे झरे पोकळ होणार नाही, तोपर्यंत प्रज्ञा जागृत होणार नाही, असे इशारावजा विवेचन केले. सूत्रसंचालन कल्पना निंबोकारव सुयश धजेकर यांनी केले.
सुनिता वरणकर, मुकुंद धजेकर, प्रकाश नागपूरकर, दीपक माथुरकर, विशाल कान्हेरकर, सतीश कान्हेकर यांनी आयोजनात पुढाकार घेतला. महिलांच्या हळदी कुकवाने सुरू झालेल्या सोहळ्याची सांगता ‘स्वरगंध’च्या सुरेल सादरीकरणाने झाली.

1 thought on “नाभिक समाजातील पत्रकारांचा अमरावतीत झाला सन्मान…

  1. अतिशय सुंदर सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे तसेच त्यांच्या कार्याला आपल्या लेखनातून प्रोत्साहित करुन आम्हा सर्वांना पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.