नगरदेवळा स्टेशन येथील रिक्षा चालकाने केली बँग परत…

रुपाली रावळ
भडगांव

भडगांव ता.प्रतिनिधी – नगरदेवळा स्टेशन समाजात माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय वेळोवेळी दिसुन येतो.असाच प्रत्यय नगरदेवळा स्टेशन येथील रिक्षाचालक गौतम संसारे याने तळई येथील कैलास संभाजी वाघ यांची महामार्गावर मोटरसायकल लरून पडलेली बँग प्रामाणिकपणे परत केल्याने पाहावयास मिळाला.
याबाबत सविस्तर असे की.गौतम हा नेहमी प्रमाणे पहाटे साडेचार वाजता रिक्षाचा नंबर लावण्यासाठी येत असताना त्यास उड्डाण पुलावर भरलेली मोठी बँग दिसता त्याने ती उचलून पाहीली असता त्यात लग्नाचे नविन कपडे,लग्नपत्रीका,व पैसे आढळून आले.गौतम याने पत्रिकेतील फोन नंबर वर संपर्क साधला असता ते तळई येथील असल्याचे व बँगेच्याच शैधात होते त्यांना त्वरीत नगरदेवळा येथे परत बोलावणे करून त्यांच्या हाती बँग सुपुर्द केली.यावेळी बँग मालक व प्रवाशांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.