नगरदेवळा येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास सुरूवात…नगरदेवळा आजपासुन विविध कार्येक्रम…कुस्तीस प्रोत्साहन म्हणून प्रमुख विजेत्यांना मिळणार चांदीची गदा…

रूपाली रावळ, भडगांव

भडगांव ता.प्रतिनिधी- नगरदेवळा तब्बल २८ खेड्यांची आस्था असलेला व प्रदिर्घ परंपरेची येथिल खंडेराव महाराज यात्रोत्सवास सुरूवात झाली असून. भाविक भक्त,व्यापारी, दुकानदारांची, लगबग सुरू झाली आहे.
दि.९ फेब्रुवारी सोमवार रोजी रोजी दुपारी २ वाजता यात्रोत्स पुजन प्रथा निमित्त प्रतीवर्षा प्रमाणे राम मंदिर चौकातुन पालखी सोहळ्यास सुरूवात होऊन, मारवाडी गल्ली, राऊळ गल्ली, अग्नावती बाजार चौक,सराफ बाजार,वाणीगल्ली, मार्गे खंडेराव महाराज मंदिरा पर्यंत मिरवणुक निचणार आहे.दि.११ मंगळवार रोजी दुपारी ४ वाजता तगतराव मिरवणुक निघुन रात्री टाकळी रोडलगतच्या यात्रोत्सव प्रांगणात नगरदेवळ्याचे लोककलावंत रतनभाऊ-सोमनाथभाऊ तमाशा मंडळाचा तमाशा रंगणार आहे.दि.१५ शनिवार रोजी दुपारी ११ ते ५ दरम्यान कुस्त्यांचा जंगी मैदानी आखाडा भरणार असून यावर्षी यात्रोत्सव पंचमंडळाने ग्रामिण भागातील मल्लविद्या पुन्हा जोमाने फुलावी यासाठी प्रमुख तिन मोठ्या मानाच्या कुस्त्यांसाठी विजेत्या मल्लांना चांदीच्या मोठ्या गदा बक्षीस ठेवल्या आहेत.तर उर्वरीत सर्व विजेत्यांनाही भरगच्च बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
तब्बल १०-१२ दिवस चालणार्या यात्रोत्सवात कच्या मसाल्याचे पदार्थ, नवनविनभांडे, कापड खरेदी, धार्मिक विधी साहीत्याची खरेदी-विक्रीची उलाढाल प्रचंड प्रमाणात होत असतेच सोबतच यात्रोत्सवा दरम्यान येणारा सोमवार बाजारही यात्रेतच भरवला जात असल्याने या यात्रोत्सवास प्रचंड गर्दी येत असते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.