नागपूरात LIC स्टॉप क्वाटर्स मध्ये मीळाले २३ पॉझिटिव्ह रुग्ण….पुर्ण क्वार्टर परिसर केला संपूर्ण सील…

शरद नागदेवे

नागपूर – कोरोनाशी लढण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासन सगळ्या उपाययोजना करित आहे.परंतू कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आता फक्त शासकीय कार्यालयातच नाही तर स्टॉप क्वाटर्स मध्ये सुध्दा कोरोना मोठ्या प्रमाणावर शिरकाव करिता आहे.

धंतोली स्थित एलआयसी स्टॉप क्वाटर्स मध्ये २३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली.एकाच इमारती मध्ये एवढे रुग्ण आढळल्याने संपूर्ण इमारतीला सील करण्यात आले.महत्वाचे म्हणजे इतर ५० जनांची कोरोना चाचणी करण्यात आली.माहितीनुसार १४ कोरोना बाधित रूग्णांना व्हीएनआयटी कोवीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here