भंडाऱ्याच्या सीईओ भुवनेश्वरी एस म्हणाल्या, मी पुन्हा येईल…सिहोरा शाळेच्या शिष्यवृत्ती वर्गाने भारावल्या

भंडारा : जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी आज रविवारला सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्ती वर्गाला भेट दिली. शाळेतील शिक्षणाचे वातावरण बघून सीईओ भारावून गेल्या. त्यामुळे शाळेतून परत जाताना, त्या मी पुन्हा येईल, असे म्हणून निघाल्या.

◆ भुवनेश्वरी एस या नुकत्याच भंडाऱ्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे. रविवारला सुट्टीचा दिवस असतानाही सीईओ भुवनेश्वरी एस यांनी जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिहोरा येथील शिष्यवृत्ती वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

◆ यावेळी शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, खंड विकास अधिकारी घटारे, गटशिक्षणाधिकारी व्ही. आर. आदमने, केंद्र प्रमुख टी. ए. कटणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

◆ सीईओ भुवनेश्वरी एस शाळेच्या कामाची पाहणी केली असता समाधान व्यक्त करून प्रसंशा केली. शाळेचा परिसर आणि तेथील शिक्षण यामुळे प्रभावित झालेल्या भुवनेश्वरी एस यांनी, मी पुन्हा एकदा भेट देणार असे उपस्थितांना अभिवचन दिले. दरम्यान, त्यांनी शाळेचे भेट पुस्तक सोबत नेले व लिहून पाठवते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एल. हटवार यांनी केले. तर आभार केंद्र प्रमुख टी. ए. कटणकर यांनी मानले. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.