डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे २२ वर्षीय पंकजच्या मृत्यू; डॉक्टरवर कठोर कार्यवाही व्हावी – आईची पोलिसात तक्रार…

दर्यापूर – किरण होले

दर्यापूर शहरातील वसंत नगर येथे राहत असलेला तरुण युवक पंकज अंबादास चव्हाण वय 22 हा 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान त्याला आजार झाल्याने तो दर्यापूर येथील कन्या शाळे जवळ असलेल्या माहिती हॉस्पिटल येथे उपचार घेत होता.

परंतु दोन-तीन दिवस ओलांडून सुद्धा उपचारादरम्यान परिस्थिती खालावली असल्याने पंकज येणे १ मार्चला कोरोना तपासणी केली. मात्र त्यातही सुद्धा पंकज चा रिपोर्ट हा निगेटिव आला. 2 मार्च रोजी पुन्हा पंकज माही हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी गेला असता डॉक्टर आणि उपचारादरम्यान सलाईन मध्ये दोन इंजेक्शन व हातात दोन इंजेक्शन लावतात पंकज ची तब्येत जास्त प्रमाणात बीघडण्यास सुरुवात झाली.

नंतर डॉक्टर आर. पी. चव्हाण यांनी पंकजला अमरावती येथे उच्चारा साठी जाण्यास सांगितले. अमरावती येथे जीनीत हॉस्पिटल मध्ये पंकजला दाखल करतात पंकज ची प्रकृती 80 टक्के खालावली होती. तर उपचारादरम्यान दोन तारखेला सायंकाळी अकराच्या सुमारास पंकजच्या मृत्यू झाला.

दर्यापूर येथील माळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आर पी चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे पंकज चा मृत्यू झाला आहे . वेळेवर उपचार न देणे व कुटुंबांना कुठल्याही प्रकारची व्यवस्थित पणे माहिती दिल्याने पंकज चा मृत्यू झाला असल्याची तक्रार पंकज ची आई बेबी अंबादास चव्हाण यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे शुक्रवार रोजी दिली आहे.

डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही रुग्णांवर हलगर्जीपणामुळे उपचार होणार नाही यासाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे डॉक्टर चव्हाण यांचा परवाना रद्द करण्याची सुद्धा तक्रार सादर करण्यात आली आहे. आता यावर पोलीस वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here