पातूरच्या कोविड केअर सेंटर मध्ये २२ जणांना केल क्वारंटाईन…घेतले जाणार घशाचे नमुने…

पातुर तालुका प्रतिनिधी


शनिवार रविवारच्या पॉझिटिव्ह निघालेल्या सहा जणांच्या संपर्कातील 22 जणांना डॉक्टर वंदना ताई ढोणे कोविड केअर सेंटर मध्ये सोमवारी ठेवण्यात आले .पुढील पाच ते सात दिवसात त्यांच्या घशाचे नमुने घेतले जाणार आहेत


गेल्या शनिवारी आणि रविवारी पिंपळखुटा आणि पातुर येथील एकुण 6 जणांच्या संपर्कातील समर्थ नगर 5 काशीद पुरा सात, समी प्लॉट सहा आणि पिंपळखुटा येथील चार जणांना पातुरच्या कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे


पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील चार करूना बाधित रुग्ण सह आतापर्यंत शिर्ला ग्रामपंचायतीच्या आणि पातुर नगर परिषदेच्या हद्दीत कोरोणा ची बाधा झालेल्या वीस रुग्णाची भर पडली त्यातील सोळा जण बरे झाले आणि एका महिलेचा कोरोणाने मृत्यू झाला.सध्या चार रुग्णांवर अकोला उपचार चालू आहेत


पातुर शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी पोलीस पत्रकार आणि शिर्ला ग्रामपंचायत आणि पातूर नगर परिषदेतील नागरिकांनी पावले उचलली आहेत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या नागरिकांवर ,वाहनधारकांवर तथा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई दररोज केली जात आहे.

मात्र उद्यापासून पोलीस प्रशासन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जी जी बायसठाकूर यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here