मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

शहर प्रतिनिधी..

मूर्तिजापूर येथील जुन्या वस्तीतील वकीलपुरा जुना हिरपुर रोडवरील रहीवाशी असलेल्या गौरव संजय गढेकर याने आपल्या राहत्या घरी दि.27 जून च्या रात्री 11.30वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वकीलपुरा जुनी वस्ती येथील रहिवासी असलेल्या मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गौरव संजय गढेकर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.गौरव यांचे वडील टेलरचे काम करतात.त्याला आई,वडील,एक भाऊ असा त्याचा परीवार आहे.

श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयातुन मिळालेल्या मेमो वरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.मनोहर वानखेडे करीत आहे.वृत्त लिहीतोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here