पालघर | जव्हार येथील युनिवर्सल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २०० बेड चे कोविड हॉस्पिटल…

विनायक पवार- पालघर

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे इर्षाद मुल्ला यांची इंग्लिश मिडीयम स्कूल ला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोविड उपचार केंद्र घोषित करण्यात आले आहे.
ही शाळा जव्हार शहराच्या बाहेर असल्या मुळे लोकांना वस्तीत जी भीती होती नाहीशी झालेली आहे, तसेच या कोरोणाच्या हलाकीच्या काळात नविन हॉस्पिटल उभे करणे प्रशासनास तेवढे सोपे नव्हते म्हणून ही शाळा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांनासाठी एक वरदान आहे.

पालघर जिल्यात कोरोणा रुग्णाची प्रचंड वाढ होत आसल्याने रुग्णालये कमी पड़त आहेत जव्हार सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात इर्षाद मुल्ला यांनी आपल्या शाळेची इमारत कोविड जम्बो रुग्णालय साठी दिल्याने प्रशासनाने शाळेच्या मालकाचे आभार मानले आहेत,

अश्या कठिन प्रसंगी जिल्यातील सर्व आर्थिक सक्षम असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन जिल्हा प्रशासनाला कोरोना काळात विविध मार्गाने मदतीचा हातभर लावावा अशे आहवान केले आहे.

इर्षाद मुल्ला यांनी आपल्या शाळेची इमारत जम्बो कोविड रुग्णालय करण्यासाठी दिल्याने पालघर जिल्यात त्यांचे कौतुक केले जात आहे. इर्षाद मुल्ला हे जव्हार येथील एक समाज सेवक असून,आपली समाजाप्रती असलेले कर्तव्य नेहमी बजावत असतात त्याच भावनेतून त्यांनी आपल्या मालकीची युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कूल हि कोविड सेंटर वापरासाठी दिलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here