अंबाळा तलावात बुडुन २ युवकाचा मृत्यु, ४ बचावले सर्व युवक नागपुरचे…

रामटेक – राजु कापसे

नागपूर वरून रामटेक कडे फिरायला आलेल्या ६ युवकांपैकी २ युवकांचा रामटेक येथील अंबाळा तलावात बुडुन मृत्यु झाला तर इतर ४ युवक बचावल्याची घटना आज दि. ९ जुन ला सकाळी ९ ते ९.३० वाजता दरम्यान घडली.

सविस्तर वृत्तानुसार नागपूर वरून ६ युवक किरायाने कॅब गाडी करून रामटेक जवळील अंबाळा येथे आले होते. दरम्यान ते अंबाळा तलावाच्या पाण्यात उतरले होते. मृतकात निसर्ग प्रभाकर वाघ वय 18 वर्ष रा.मानवसेवा नगर, नागपूर व कार चालक कृणाल नेवारे वय 18 वर्ष रा.रवी नगर,नागपूर यांचा समावेश आहे.मृतक निसर्ग हा भिवापुर येथे विस्तार अधिकारी असलेले प्रभाकर वाघ यांचा मुलगा आहे.

दरम्यान तलावाच्या पाण्यात गाळ टाकून निसर्ग याचा मृतदेह काढण्यात आला तर दुसऱ्याचा शोध घेणे सुरु आहे.माहितीनुसार मृतक हे कृणाल यांच्या किरायाच्या कारणे पाच मित्र रामटेकला फिरायला आले होते.अंबाळा तलावा परिसरात सध्या अंत्यविधी नंतरचे क्रियाकर्म करण्यावर बंदी असल्याने या परिसरात आज वर्दळ न्हव्हती. तसेच या ठिकाणी कुणी येऊ नये म्हणून बाहेरून येण्यारे वाहन व लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस चौकी लावून बंदी घातली आहे.

हे मित्र सगळे 8.15 ला कारणे पोलीस चौकीजवळ पोहचताच कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी गाडी मागे निर्जंनस्थळी ठेवली व गडमंदिर च्या मागच्या भागाकडून पायदळ अंबाळा तलावाजवळ पोहचले व पाण्यात उतरले. सर्व 6 युवक पाण्यात उतरल्याने 4 युवकापैकी 2 युवक तलावात बुडाले तर 4 युवक सुखरूप बचावले. रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here