नागपूर अंतर्गत पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील पूर्व कुटुंबा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ५१५ मध्ये साधारण २ वर्षे वयाचा मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आला…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 28/04/2021 रोजी सकाळी 12:30 च्या दरम्यान नियतक्षेत्रात नेहमीप्रमाणे जंगल गस्ती करत असताना वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली. या घटनेची माहिती कळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेन्दू पाठक, सहायक वनसंरक्षक किरण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड घटनास्थळी दाखल झाले.

मृत मादी बिबट हा साधारणत दोन वर्षे वयाचा असून त्याच्या शरीरावरील झटापटीच्या खुणा पाहता त्याचा मृत्यू दुसऱ्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. घटनेपासून 1000 मीटर च्या परिघात अन्य प्राण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अस्तित्वाचा तपास वनकर्मचारी घेत आहेत.

दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (SOP) सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येऊन रीतसर दहन करण्यात आले. यावेळी अमलेन्दू पाठक, (उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूर) किरण पाटील ( सहायक वनसंरक्षक, रोहयो व वन्यजीव), प्रतिक मोडवान (वपअ, पवनी) प्रदीप संकपाळ (वपअ, चोरबाहुली)

डॉ. चेतन पातोंड (पशुवैद्यकीय अधिकारी, पेंच) डॉ. दत्ता जाधव , (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, रामटेक) यश दाभोळकर (अशासकीय संस्था प्रतिनिधी) सहदेव टेकाम (NTCA प्रतिनिधी) आदि उपस्थित होते.सदर घटनेबाबत अधिक तपास वनपाल राजीव मेश्राम तसेच वनरक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here