प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच,ग्रामस्थांत तीव्र नाराजी…संबंधितांवर चौकशी करून कार्यवाही करा…योगेश पाटील शिंदे

मुक्रमाबाद मुखेड तालुका प्रतिनिधी यादव गायकवाड

गावचा कारभार सर्व ग्रामस्थांना माहिती व्हावे व शासनाच्या विविध योजनांची जनजागृती व्हावी यासाठी सरकारने वर्षातून चार वेळा म्हणजेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर, १ मे रोजी गावसभा ( ग्रामसभा) बंधनकारक केल्या आहेत. या चार ग्रामसभांपैकी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी असलेल्या ग्रामसभा डोरनाळी ता मुखेड येथे घेण्यात आली नसून ते फक्त ग्रामपंचायतीतच कागदोपत्री घेतल्या गेली आहे. २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर लगेच ग्रामसभा घेयाला पाहिजे होत पंरतु ग्रामसभा न घेता ग्रामसभेला दांडी मारण्यात आली आहे. विविध विषयांवर ग्रामसभेच्या माध्यमातून चर्चा होणे अपेक्षित होते पण ग्रामसभेला गतसालापासून दांडी मारल्या जात आहे. यामुळे आता ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच होत आहेत यामुळे नागरिकात नाराजी दिसून येत आहे.
ग्रामीण भागात बहुतांशी गावात प्रजासत्ताक दिवशी ग्रामस्थ आपली शेतीतील कामे बंद करून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. कारण या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषण स्पर्धा, ढोल वादन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. शिवाय, ग्रामसभेची माहिती याच दिवशी सर्व ग्रामस्थांना समजते म्हणून काही गावामध्ये पाळकही पाळला जातो. मात्र, ग्रामसभा यापुढे इतर कोणत्याही दिवशी घेतल्यास या ग्रामसभांकडे ग्रामस्थ आपली कामे सोडून उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेणे गरजेचे होते पण ग्रामसभा २६ जानेवारी रोजी फक्त कागदोपत्रीच घेतल्याने नागरिकांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामसभा प्रत्यक्षात न घेता डोरनाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावच्या नागरिकांच्या सह्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रोसिडिंगला घेतल्या आहेत. अशी नागरिकात चर्चा होत आहे २६ जानेवारीच्या सभा इतर दिवशी घेतली तरी या कागदोपत्रीच होण्याची शक्यता आहे.कारण इतर दिवशी ग्रामसभेला नागरिक उपस्थित राहणारच नाहीत. हा सर्व नागरिकांना अनुभव आला आहे.

1 thought on “प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा फक्त कागदोपत्रीच,ग्रामस्थांत तीव्र नाराजी…संबंधितांवर चौकशी करून कार्यवाही करा…योगेश पाटील शिंदे

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.