तेलंगणा राज्यातील कागदनगर मतदारसंघातील आमदार कोनेरु कोनप्पा यांनी शनिवारला यात्रा महोत्सवाला भेट…

तेलंगणा राज्यातील कागदनगर मतदारसंघातील आमदार कोनेरु कोनप्पा यांनी शनिवारला यात्रा महोत्सवाला भेट दिली.त्यांचा हस्ते महासमाधीची पुजा करण्यात आली. मागिल विस वर्षापासून आमदार कोनप्पा यात्रा महोत्सवाला भेट देत असतात. त्यांनी संस्थानला भरिव मदत केली आहे.

संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या कार्याने,पदस्पर्शाने धाबा गावाचे नाव लौकिक आहे. महाराष्ट्र-तेलंगणातील भक्त स्वामी समाधीस्थळी नतमस्तक होतात.स्वामींचा आशिर्वादाने मला दूसर्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. मंदिराचा सर्वांगिक विकासासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे असे मत राजूरा विधानसभेचे आमदार सूभाष धोटे यांनी व्यक्त केले. कोंडय्या महाराज यात्रा महोत्सवातील कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्र-तेलंगणातील भक्तांचे आराध्य दैवत संत परमहंस कोंडय्या महाराज यांचा यात्रा महोत्सवाला सूरवात झाली आहे. शुक्रवारला आमदार धोटे यांच्या हस्ते घटस्थापणा करण्यात आली. महासमाधिची विधिवत महापुजा करण्यात आली. यानंतर झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमात संस्थानचा वतीने धोटे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.