शेतातील विहीरीत पडुन १८ वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू…

भेंडीमहाल ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील अमोल पंजाबराव घणगाव वय वर्ष १८ हा युवक महान पिंजर रोडवरील घाटटेक फाटया जवळील आपल्या शेतात जेवायला बसलेल्या मजुरांसाठी याच शेतातील विहीरवर पाणी आणण्यासाठी गेला असता यावेळी पाय घसरून विहिरीत पडला.

तो विहरीत पडल्याची माहिती अक्षय आगे रा.टेभी यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली लगेच दीपक सदाफळे यांनी पिंजरचे ठाणेदार भारसाकडे साहेबांना मिळालेल्या घटनेची माहिती दीली तेव्हा तात्काळ आपण जाऊन सर्च ऑपरेशन करा मी तो पर्यंत लगेच पोलिसांना घेऊन पोहचतो यावेळी क्षणाचाही विलंब न करता लगेच

अंकुश सदाफळे,मयुर सळेदार, ऋतीक सदाफळे,शुभम वानखडे,यांना रुग्णवाहिका शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी पाठविले तो पर्यंत पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी शेतातील मजुरांना फोनवरून मार्गदर्शन करत अमोलला विहरीतुन बाहेर काढयला लावले यावेळी विहीरीत अं.दहा फुट खोल पाणी असल्याने लगेच मजुरांनी अमोला बाहेर काढले तात्काळ पथकाच्या रुग्णवाहिकेने अवघ्या दहा मिनिटात पिंजर प्रा.आ. केंद्रात दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आगलावे साहेबांनी तपासणी केली तेंव्हा हा युवक मृत झाल्याचे सांगितले. आता पुढील कार्यवाही पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भारसाकडे साहेब आणी पोलीस कर्मचारी करीत आहेत.असी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here