दिग्रस बु येथे १७ वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या…उत्कृष्ट गायक,हसमुख असल्याने गावावर शोककळा…

पातूर

पातूर तालुक्यातील दिग्रस बु येथील शेतकरी अशोक केशव गवई यांचा एकुलता एक मुलगा राजपुत्र अशोक गवई या १७ वर्षीय मुलाने विषारी औषध खाऊन जीवन सम्पविले असल्याची घटना रविवार रोजी सायंकाळ दरम्यान घडली आहे.

सततच्या नापिकीमुळे ,व लॉकडाऊन मध्ये पैस्याची अडचण त्यामध्ये त्या मुलाचं शिक्षण या सर्व गोष्टींचा विचार करत त्याने विषारी औषध घेतल्याचे संशय व्यक्त करीत असल्याचे चर्चेत आहे.

या अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार दरम्यान २८ जून रविवार रोजी मृत्यू झाला आहे.तसेच हा मुलगा उत्कृष्ट गायक असून,लग्न सभारभात बँड सोबत त्याची मोठी मागणी होती.तसेच वडिलांच्या कामात सतत मदत करीत होता.

गावात प्रत्येकाशी हसत हसत बोलत असल्याने सर्वाचा लाडका होता.हा जाण्यामुळे सर्वत्र गावात दुःखाचे वातावरण पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या मागे आई वडील ,बहीण,आजी काका असा आप्त परिवार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here