शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह…सचिन सावंत

मुंबई, दि. २२ जानेवारी २०१९
राज्यातील शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी स्वागत करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की देशातील सद्यपरिस्थिती पाहता ज्यांची संविधानावर श्रद्धा नाही किंबहुना संविधानाला विरोधच आहे. अशा मानसिकतेचे लोक केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत. संविधानामध्ये निर्देशीत केलेल्या तत्वांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. देशाची एकता, प्रगती ही संविधानाच्या मुलभूत तत्वांवरच चालून साध्य केली जाऊ शकते म्हणूनच सर्व भारतीयांची संविधानावरती श्रद्धा असणे आणि संविधानाचे महत्त्व त्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. याचकरिता संविधानाच्या उद्देशिकेचे शालेय विद्यार्थ्यांद्वारा सामूहिक वाचन व्हावे हा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

1 thought on “शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह…सचिन सावंत

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.