कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार करून पैसे,दागिने लुटल्याची घटना…चार ही आरोपी अटकेत…

(फाईल फोटो)

मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस वरून आपल्या सासुरवाडी एमपी ला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी चार जणांनी बलात्कार करून तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे.पिडीत महिला हि रात्री ११ वाजतच्या दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली त्या ठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्या वर बलात्कार केला.ही घटना घडत असतानाच असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी देखील या महिलेवर बलात्कार केला. तसेच पिडीत महिलेचे रोख रु. 3000 आणि मंगळसूत्र खेचून घेवून पळून जात असताना पिडीत महिलेस रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांच्या मदतीने दोन आरोपी लागलीच अटक केले.तर आज पहाटे दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे मात्र या परिसरात खळबळ उडाली आहे.मात्र बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चार ही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.

1 thought on “कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार करून पैसे,दागिने लुटल्याची घटना…चार ही आरोपी अटकेत…

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.