नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर – विजय वडेट्टीवार…

गडचिरोली जिल्हयासाठी 46 लक्ष रुपये निधी.

गडचिरोली – मिलींद खोंड

नागपूर विभागात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत वाटप तसेच मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयासाटी 16 कोटी 48 लाख 25 हजाराचा निधी मंजूर झाला आहे.

आजच भंडारा दौऱ्यावर असतांना वडेट्टीवार यांनी निधीची घोषणा केली व शासन निर्णय निर्गमित केला.मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणि सोडल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे 5 मीटर पर्यंत पाणी सोडावे लागल्याने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात 1994 पेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व नागरिकसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या दौरा केला.

या चारही जिल्हयातील आलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यात येणार असून यासाठी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे असे आश्वासन त्यांनी दिले व दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली. त्यानुसार आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील 6 जिल्हयातील मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना सहाय्य व मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता 8 कोटी 86 लाख 25 हजार रूपये व घराची अंशता: क्षती झालेल्या मदतीसाठी 7 कोटी 15 लाख व मदत छावण्या चालविण्यासाठी 47 लाख रूपये असे एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्हयासाठी 46 लाख रूपये निधी मंजूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here