भुसावळ विभागातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू…

भुसावळ महवॉइस
 

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाउनच्या काळात रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वेबोर्डाच्या आदेशानुसार हे आरक्षण कार्यालय २२ मे पासून भुसावळमंडळातील १४ आरक्षण कार्यालय आपल्या वेळेनुसार सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही दि.२५ पासून सुरू होईल.


भुसावळ विभागात
भुसावळ-२, जळगाव-२, चाळीसगाव-१, अकोला-२, खंडवा -१,बुरहानपुर -१, मनमाड-१, नाशिक-२, अमरावती-२ अशा तिकीट खिडक्या चालू राहणार आहेत.

Also Read: चंद्रपूर | सिंदेवाही तालुक्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण…रुग्णांची संख्या १५ वर


आरक्षणधारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये की त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि आरोग्याचा धोका होऊ शकतो. ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहे त्या प्रवाशांचे आरक्षण तिकिटांचा परतावा हा सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत दिला जाईल.

त्यामुळे त्यांनी स्टेशनवर सर्वांनी गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here