पातूर शहरात एकाच दिवशी १४ कोरोना पॉझिटिव्ह…

एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश…त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील नऊ जणांना कोरणाची बाधा…एक शिक्षकही कोरोना पॉझिटिव्ह…

पातूर : शहरांमध्ये कोरोना संकट वाढत चालले असून दिनांक चार ला प्राप्त अहवालानुसार 14 कोरोना बाधित रुग्ण असल्याची गंभीर बाब समोर आली आहे गेल्या 27 तारखेला निघालेला पातुर शहरातील चार करुणा बाधित रुग्ण सापडले होते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना डॉक्टर वंदनाताई ढोणे कोविड केअर सेंटर मध्ये कॉरेनटीन करून ठेवण्यात आले होते

त्यापैकी 31 जणांचे स्वाब नमुने तपासणी ला पाठवले असता चौदा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे तर 16 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे व एक प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी पातुर शहरातील जमादार प्लॉट मधील एका कोरोना बाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तर देवळी मैदान येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील चार जणांचे रिपोर्ट सुद्धा आज पॉझिटिव्ह आले आहेत

तर गेल्या आठवड्यात निघालेल्या समर्थ नगर येथील कोरणा बाधितरुग्णाचा घरमालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याचे अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पातुर शहरात सह तालुक्याचा बाधितांचा आकडा 48 झाला यापैकी 34जण उपचार घेत असून 12जणांनी कोरोनावर मत केली आहे तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर बाधितांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील सर्व जणांना डॉक्टर वंदनाताई ढोणे कोविड केअर सेंटरमध्ये कॉरानटीन केले आहे

यामध्ये चार शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांचे संखे मुळे कॉरेनटाईम सेंटर ती क्षमता संपत असून एक पर्यायी उपाय म्हणून नगरपरिषदेच्या मौलाना आजाद सभागृहाला कोविड केअर सेंटर करण्यासाठी ची तयारी चालली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी पापळकर यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी पातूर येथे आढावा सभा घेतली होती

त्या अनुषंगाने आता पातूर येथे न. प शाळा क्र 1व 2मध्ये रविवारी स्वाब संकलन केंद्र सुरू होणार आहे त्यामध्ये वयोवृद्ध गर्भवती महिला बालके यांचा समावेश असणार आहे त्यासाठी नगरपरिषद सदस्यांनी पुढाकार घेऊन लोकांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करून घराबाहेर काढावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here