यवतमाळ जिल्ह्यात १३२३ जण पॉझेटिव्ह ; ८०३ कोरोनामुक्त आदिलाबाद, नवी मुंबई, नागपूर येथील तीन मृत्युसह एकूण ४५ मृत्यु…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात गत 24 तासात 1323 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 803 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 45 मृत्यु झाले. यातील 33 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर आठ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. सोमवारी झालेल्या एकूण 45 मृत्युपैकी तीन मृत्यु जिल्ह्याबाहेरील म्हणजे आदिलाबाद, नवी मुंबई आणि नागपूर येथील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6154 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1323 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4831 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6703 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2731 तर गृह विलगीकरणात 3972 रुग्ण आहेत.

तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 49132 झाली आहे. 24 तासात 803 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41272 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1157 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.50 असून मृत्युदर 2.35 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 25, 46, 56, 42, 78, 65, 54, 63 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 36, 30, 63, 69, 42, 56 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, नेर येथील 35 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 39 वर्षीय पुरुष व 66 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 36 व 68 वर्षीय महिला, दारव्हा येथील 55 वर्षीय पुरुष, वणी येथील 61, 76 वर्षीय पुरुष व 50, 52 वर्षीय महिला, राळेगाव येथील 63 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, झरी तालुक्यातील 85 वर्षीय महिला, पुसद येथील 60 वर्षीय पुरुष आणि आदिलाबाद (आंध्र प्रदेश) येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये दारव्हा येथील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 36 वर्षीय पुरुष, महागाव येथील 70 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53, 45, 36 वर्षीय पुरुष, पुसद येथील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 36 वर्षीय पुरुष, वणी येथील 42 वर्षीय महिला, नवी मुंबई येथील 67 वर्षीय पुरुष आणि नागपूर येथील 70 वर्षीय महिला आहे.

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1323 जणांमध्ये 744 पुरुष आणि 579 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 280 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 186, दिग्रस 157, दारव्हा 139, पांढरकवडा 133, वणी 70, बाभुळगाव 69, उमरखेड 61, झरी 52, कळंब 46, महागाव 38, आर्णि 38, घाटंजी 22, मारेगाव 13, नेर 6, राळेगाव 6, आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 393080 नमुने पाठविले असून यापैकी 388208 प्राप्त तर 4872 अप्राप्त आहेत. तसेच 339076 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here