अमरावतीत १२०० जिलेटिन कांड्या केल्या जप्त…दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई…

न्यूज डेस्क – अमरावतीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाच्या सेल (एटीसी) ने नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1200 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. स्फोटकांचा हा साठा एका कारमध्ये भरून नेला जात असताना दहशतवाद विरोधी सेलने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसच्या सेलने कानसिंह राणावत आणि सुरज बैस या 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1200 जिलेटीन कांड्या, एक फोर्ड इकोस्पोर्टवाहन व दोन मोबाईल असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही स्फोटके नेमकी कशासाठी आणली गेली, याचा पोलीस शोध घेत आहे.

हे दोन्ही आरोपी नांदगाव पेठ परिसरातील रहिवासी आहेत. यापूर्वीदेखील जिल्ह्यातील तिवसा पोलिसांच्या हद्दीत जिलेटिनचा कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या जिलेटिनच्या कांड्या येत असल्याच्या बाबीला दुजोरा मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here