अमरावती शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर…मनपा आयुक्तांनी केली प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी…

न्यूज डेस्क – विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा वाढत असल्याने अमरावती शहरात आता प्रतिबंधित क्षेत्र केले व तसेच जिल्ह्यात ३६ तासाची टाळेबंदी केली आहे. यामध्ये अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरातील 12 कंटेनमेंट झोन घोषित केले आहे, या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे असे आदेश प्रशासनाने दिला आहे,तर या ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले आहे.

तर या ठिकाणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी कॅटेन्मेंट झोन असलेल्या श्रीकृष्ण पेठ येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला, या 12 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here