इराणच्या चुकीने १७६ जणांचा मृत्यू…युक्रेनच्या विमान हल्ल्याची इराणच्या लष्कराकडून कबुली…

डेस्क न्यूज

इराण ची राजधानी असलेल्या तेहरान जवळ एका बोईंग युक्रेनियन पॅसेंजर विमान कोसळल्याची घटना घडली होती या विमानात १७६ प्रवासी होते तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झालाअसे प्रथम सांगण्यात आले होते मात्र हा क्षेपणास्त्र हल्ला स्वत इराण कडून चुकून झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.या हल्ल्यात १७६ प्रवाशी मारल्या गेले होते .मानवी चुकांमुळे त्यानी स्वतःचे विमानावर क्षेपणास्त्र हल्ला  केल्याचे इराणचे म्हणणे आहे. यापूर्वी इराणने सांगितले की विमानात बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला.

बोईंग विमानात १७६  लोक सवार होते. सर्व लोक मरण पावले. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स बसलेले बहुतांश प्रवासी इराणचे होते. इराणचे ८२, युक्रेनचे ११, स्वीडनचे १०, अफगाकिस्तानचे ४ जर्मनी ३ यूकेचे ३ लोकांसह ६३ कॅनडियन होते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.