मुंबईत मुसळधार पावसाचा कहर…मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू…

न्यूज डेस्क – मुंबईत काल पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. रात्री अकराच्या सुमारास मुंबईच्या मालाड पश्चिम भागात निवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्था ANI दिली आहे. या व्यतिरिक्त बरेच लोक मलब्याखाली दबले आहेत.

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड मालवणी भागातील न्यू कलेक्टर कम्पाऊंड परिसरात एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारील दोन मजली घरांवर पडला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार मालाडच्या जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंडमधील इमारत कोसळल्याने आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू आणि 8 जण जखमी झाले आहेत.

आतापर्यंत महिला आणि मुलांसह 15 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक सुद्धा घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. मोठ्या वेगाने घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पाऊस सुरू असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here