हैदराबाद मुसळधार पावसामुळे हाहाकार…११ लोकांचा मृत्यू…

न्यूज डेस्क – तेलंगणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. तर हैदराबाद मध्ये मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची भिंत कोसळून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत ४० वर्षीय महिलेचा आणि तिच्या १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

मंगळवारी मुसळधार पावसामुळे इब्राहीमपट्टनम भागात त्याच्या जुन्या घराची छत कोसळली.दुसरीकडे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या वाहून जात असल्याचं पाहायला मिळालं.

हैदराबादच्या बदलागुडा भागात मुसळधार पावसामुळे एक बोल्डर घरात पडला. यामुळे एका मुलासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य ३ लोक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात सध्या बचावकार्य सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे हैदराबादचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अटापूर मेन रोड, मुशीराबाद, तोली चौकी परिसर आणि दामीगुडा या भागातील अनेक भाग पाण्यात बुडाले. रस्त्यावर पाणी साचल्याने लोक घरात कैद झाले आहेत. वाहतूक सेवाही ठप्प झाली. सखल भागात घरांच्या आत पाणी होते. एसडीआरएफची टीम बचाव कार्यात कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here