कागल येथील आय बी पी पंपा जवळील ११ बसेस परतल्या…

प्रतिनिधी – राहुल मेस्त्री…

तीन मे नंतर लॉक डाऊन शितील झाल्यापासून अनेक भागातील नागरिक आपल्या गावाला जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्याच प्रकारे कर्नाटक येथील बिदर आणि गुलबर्गा जिल्ह्यातील शेकडो नागरिक कामासाठी व व्यवसायासाठी मुंबईसह वाशिम ,नवी मुंबई याठिकाणी वास्तवास आहेत.

मात्र लाँकडावुन असल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या 11 बसेसमधून 247 प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आय बी पी पेट्रोल पंपा जवळील कर्नाटक बॉर्डर वरती आले होते.

या सर्वांना त्या ठिकाणच्या पोलिसांनी पाठवले आहे .असे सर्व प्रवासी म्हणत आहेत .मात्र याठिकाणी आल्यावर या प्रवाशांना थांबावे लागले आहे .कारण कर्नाटक सरकारने 19 मे नंतर आंतरराज्य बंदी केली आहे. त्यामुळे या प्रवाशांना कर्नाटकात जाता येत नाही. तर काही प्रवासी म्हणतात की आम्हाला सोलापूर मार्गे कर्नाटकात जायचं होतं.

मात्र बेळगाव मार्गे कर्नाटकात जाण्यासाठी आणले आहे. सोलापूर मार्गे गेल्यानंतर त्या बॉर्डर लगतच आमची गावे आहेत असे प्रवासी म्हणत. त्यांना ई पास शिवाय कसे काय आलात विचारले असता म्हणतात .की आम्हाला मुंबईमध्ये सांगितलं होतं कर्नाटक बॉर्डर पर्यंत आम्ही तुम्हाला सोडू .व तिकडे कर्नाटक बसेस तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतील.

Also Read: भाजपचे आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी…संतोष उत्तरवार जिल्हासचिव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

मात्र इथे आल्यानंतर समजले की कर्नाटकात प्रवेश बंद आहे. याठिकाणी एसटी महामंडळाच्या अधिकारऱ्या म्हणाल्या कर्नाटक बॉर्डर पर्यंतच सोडण्याचे पत्र आमच्याकडे आले आहे. यामुळे यात कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे हे समजेना.ही बातमी कर्नाटक पोलिसांना समजताच बेळगावचे पोलीस अधीक्षक श्री लक्ष्मण निम्बर्गी यांनी याठिकाणी भेट देऊन महाराष्ट्र ,कागलचे पोलिस निरीक्षक श्री दत्तात्रय नाळे यांना सांगितले की सध्या कर्नाटकात मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे. कोणत्याही प्रवाशाला इ पास शिवाय राज्यात घेऊ नये.

त्यामुळे या सर्व प्रवाशांना परत पाठवावे..तर या सर्व प्रवाशांना कागल पोलिसांनी व्हाईट आर्मी कोल्हापूर यांच्या माध्यमातून जेवणाची सोय केली . त्यांना पुन्हा बस मध्ये बसवुन मुंबईच्या दिशेने रवाना केले जाईल अशी माहिती कागलचे पोलिस निरीक्षक श्री दत्तात्रय नाळे यांनी दिली. यावेळी कोल्हापूरचे डीवायएसपी प्रशांत अमृतकर व परिवहन खात्याच्या उपनिरीक्षक गावडे मॅडम सह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here