हिवरी येथील बोरकर परिवाराची महालक्ष्मी पूजनाची १०१ वर्षाची परंपरा अखंडपणे सुरू…

भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची. गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील गणेश विठ्ठल बोरकर यांच्याघरी ही महालक्ष्मी पूजन करण्यात आले.

बोरकर यांच्याकडे गेल्या 101 वर्ष्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे त्यांच्याकडे महालक्ष्मी चालू झोपाळ्यावर असतात आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी किंवा महालक्ष्मी येतात.

आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते. काही ठिकाणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here