मोझरीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचा १००% निकाल…विद्यार्थांचे शाळेकडून कौतुक…

नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालामध्ये लिटील फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांचे घवघवीत यश सम्पादन केले व तिवसा तालुकामधून १००% निकाल देणारी एकमेव शाळा हे या निकालाच्या माध्यमातून सिद्ध केले.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्षा बुशारा पठाण मॅडम यांनी कौतुक व सत्कार केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सेजल गावंडे हिला 96.63, संस्कृती गावंडे 95.40, वृंदा डहाके 93.80, फैजान सिद्दीकी 92.80, इब्राहिम पठाण 92.80, यशस्वी मुंद्रे 92.60, भूमिका दास 92.80, श्रावणी पोहोकार 92, कल्याणी निमकर 91.40, रेवती गाढवे 90.40, ऐश्वर्या अंबलकर 90.80, कांचन कोकाटे 90 या प्रकारे विद्यार्थ्यांनी गुण मिळविले.

यावेळी संस्थाध्यक्ष बुशरा पठाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाला लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका हुमायरा खान मॅडम, लिटिल स्टार इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका वंदना माहोरे मॅडम, इंटरनॅशनल मिलिटरी स्कूल चे मुख्याध्यापक सुरज पाटील सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here