Breaking | यवतमाळात १०० आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध…आवाज दडपल्या जात असल्याचा केला आरोप

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ – कर्जमाफी योजनेस पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेत लाभ मिळावा म्हणून प्रशासनाला आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अशा 100 शेतकऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्द

सन 2017 साली सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीच्या लाभापासून शेतकरी वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अजूनही कर्जमाफी चा लाभ झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता आत्मदहन करण्याचा इशारा यवतमाळ शहर पोलिसांनी 73 शेतकऱ्यांना
घाटंजी पोलिसांनी 35 शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

खरीप हंगामात शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत. त्यांना कर्जमाफी आणि दुष्काळी मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांकडे लक्ष वेधणार होते. शेतकऱ्यांनी आत्मदाहनाचा इशाराही दिला होता.

त्यापूर्वी यवतमाळ येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर रोखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. काही घाटंजी तालुक्यातील शेतकरी आहेत. शासनाने आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here