Saturday, June 15, 2024
spot_img
Homeशिक्षणशिर्ला रा.सा.विद्यालयाचा १०० टक्के निकाल...

शिर्ला रा.सा.विद्यालयाचा १०० टक्के निकाल…

शिर्ला – संतोषकुमार गवई

शिर्ला तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील रामकृष्ण सावंत विद्यालयाचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून दहावीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च २०२४ चा निकाल नुकताच ऑनलाईन स्वरुपात जाहिर करण्यात आला आहे,

रा.सा.विद्यालयातून सदर परिक्षेसाठी एकुण २४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ३ विद्यार्थी प्रथम श्रेणी,२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले असून करण गणेश बळकार याने ८९.२० टक्के गुण प्राप्त करुन विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवीला आहे,

द्वितीय क्रमांक रोहन ज्ञानेश्वर खरडे ८७.४० गुण, तृतीय क्रमांक कु.अपूर्वा सुनिल इंगळे ८६.८० गुण मिळवीले आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रामसिंगजी जाधव व मुख्याध्यापक पी.जे.राठोड तसेच आई-वडील व शिक्षक वृंदांना दिले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: