चिखलदरा | अघोरी पणाचा कळस !…८ महिन्याच्या बालकाच्या पोटावर गरम विळ्याने दिले १०० चटके…

अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम भागात वसलेला आदिवासी समाज आज देखील अंधश्रद्धा जपतो आहे हे पुन्हा एकदा उघड झालेलं.अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा हिच्या ८ महिन्याच्या बाळाला पोटफुगी झाल्यानंतर आई वडिलांनी बुवा भगत यांचा सल्ला घेऊन गरम विल्याने १०० वेळा चटके दिलेत.याला डंबा अस म्हणतात.

भरारी पथकाला याची महिती मिळताच ८ महिन्याच्या श्यामला वैद्यकीय उपचारार्थ हलविले तर आई वडिलांना विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. तर दुसरीकडे याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं आहे. मेळघाट मध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असतांना येथील आदिवासी अंधश्रद्धेच्या विळख्यात अळकलेला दिसतो आहे.

बाईट:- हरीष केदार,अनिस अमरावती

डॉ आदित्य पाटील-वैद्यकीय अधिकारी काटकुंभ

आकाश शिंदे ठाणेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here