नालासोपाऱ्यात १० वर्ष जुनी ४ मजली इमारत कोसळली…

वसई: यंदा मुंबईत भरपूर पाऊस आल्याने अनेक जुन्या इमारती धोकादायक झाला आहेत. नालासोपाऱ्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास साफल्य नावाची ४ मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. ही इमारत १० वर्ष जुनी आहे. सोमवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. त्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली.

मात्र अवघ्या काही वेळात म्हणजे दीडच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली. इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवित झाली नाही.

आम्हाला आवाज आल्याने आम्ही खाली आलो आणि काही वेळेत संपूर्ण इमारत कोसळली. आमचा सारा संसार ढिगाऱ्याखाली गेला, असे या इमारती राहणाऱ्या सीमा देवरुखकर या महिलेने सांगितले. प्रतिनिधी एच एस दसोनी नालासोपारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here