नगरधन -चिचाळ्यातील १० जण नागपुर येथे तर २५ जण रामटेकला संस्थात्मक विलगीकरणात…

सर्वांचे “थ्रोट स्वॅब” नमुने तपासणीसाठी घेण्यात आले

राजू कापसे

रामटेक – नगरधन येथील कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या १० जणांना नागपुरला संस्थात्मक विलगीकरणात तर इतर २५ जणांना रामटेक येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.


नगरधन येथे पूण्यावरून आलेल्या तरूणाचा कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्रशासनाने त्वरित हालचाल करून तरूणाला चौकशी करून नागपुरला उपचारासाठी हलविण्यात आले तर त्याचे आईवडिल ,सासुसासरे,इतर नातेवाईक ,त्यांना नागपुरवरून नगरधन येथे घेऊन येणार्‍या ड्रायव्हरसहीत १० जणांना आज नागपुरला संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात आले

तर आज बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना रामटेकला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. यात तीन कर्मचारी आहेत.या सर्वांचे “थ्रोट स्वॅब”चे नमुने घेऊन नागपुरला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होईल.

तरुणाची चौकशी,तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे “थ्रोट स्वॅब,चे नमुने आज (२९ जून) घेण्यात येतील.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.चेतन नाईकवार यांनी दिली.चिचाळा येथील तरुणाच्या सासुरवाडीचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे,गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले,प्रभारी तहसिलदार कुमरे, ठाणेदार दिलिप ठाकूर,आरोग्य विभागाचे अधिकारी ,कर्मचारी ,परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here