अज्ञात वाहनाच्या धडकेत १ ठार १ जखमी…पवनी येथे महामार्गावरील घटना…

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर काल दि.१५ ऑक्टोबर शुक्रवारला सकाळी१०:३०वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटार सायकल क्रमांक एम एच-४०/व्ही-९४११ ला मागून जोरदार धडक मारक्याने मोटार सायकल वर मागे बसलेला मुस्ताक अहमद मो. आयुम अन्सारी(४०)हा जागीच मृत पावला तर मोटार सायकल चालक मुस्ताक खान मुस्ताकिम खान(४५)हा गंभीरपणे जखमी झाला.हे दोघेही कामठी येथील रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार कामठी येथील रहिवासी मृतक मुस्ताक अहमद मो. आयुम अन्सारी(४०),व यातील जखमी मुस्ताक खान मुस्ताकिम खान(४५)हे दोघेही सकाळी ९वाजताच्या सुमारास आपल्या मोटार सायकल क्रमांक एम.एच-४०/व्ही-९४११नी आईला भेटण्यासाठी आपल्या साळ्यासोबत शिवनी येथे जात असतांना पवनी शिवारात राष्ट्रीय महामार्गावर अंदाजे १०:३० वाजताच्या सुमारास पवनी येथे पोहचल्यावर महामार्गावर कंटेनर क्रमांक एच.आर-५५ /ए.जे- ६११२ हा रोडवर बंद अवस्थेत उभा असल्याने त्याला क्रॉस करून पुढे जात असतांना मागुन अचानक एक अज्ञात कंटेनर भरधाव वेगाने आला व मोटार सायकल स्वारास मागून धडक दिल्याने मोटार सायकल वर मागे बसलेला मृतक मुस्ताक अहमद मो.आयुम अन्सारी(४०) हा महामार्गावर मधोमध पडल्याने कंटेनारचा मागील चाक त्याचे डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा होऊन घटनास्थळीच मृत पावला तर मोटारसायकल स्वार मुस्ताक खान मुस्ताकिम खान(४५) हा गंभीर रीत्या जखमी झाला.

सदर अपघाताची माहिती मिळताच देवलापारचे पोलीस विजय परमेश्वरे, कृष्णा टेकाम,राजेश सोनटक्के तात्काळ घटनास्थळी दाखल होवून मृतकाला व जखमीला रुग्णवाहिकेतून देवलापार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपराध कमांक व कलम-१६३/२१ कलम २७९,३३७,
३०४(अ)भादवी सहकलम १८४ मोवाका नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी घोडके ह्या करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here