१.१ कोटी चे “अफगानी चरस” अंधेरी येथून जप्त’, सापळा रचून २ सराईत आरोपीला केली अटक…

धीरज घोलप

मुंबई मध्ये काही दिवसापासून ड्रंग माफियां विरोधात धडाकेबांज कारवाई सुरू आहे. मात्र , आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांने “अफगानी चरस ” नावाच्या अमली पदार्थावर मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 1 लाख 25 हजार रूपये किंमत असणारे 1 किलो 225 ग्राम “अफगानी चरस ” जप्त केलेल आहे.अमली पदार्थाच्या विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने ही मोठी कारवाई केली असून “अफगानी चरस ” तस्करी करणार्या आरोपीला तुंरूगात पाठवण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक बांद्रा युनिटला 13 तारखेला मिळालेल्या माहिती नुसार अंधेरी परिसरात , गांवदेवी रोड जवळ , “अफगानी चरस ” ची तस्करी करण्यासाठी 2 इसम येणार असल्याचे कळल्यावर त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक बांद्रा युनिट ने सापळा रचला आणि संशयिक इसमाला बेड्या ठोकल्या त्यांची झाडा झडती घेतल्यावर त्याकडून “अफगानी चरस ” चा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here