३३ वषार्नंतरही रामायण,महाभारताची क्रेझ कायम…आता डिजिटल टीव्हीवर बघायचा घेत आहे आनंद…

राजू कापसे,रूपेश वनवे,रामटेक/नागपुर

आपल्या भारत देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर कसे नियंत्रण केल्या जाईल यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत.त्याच अनुषंगाने माहिती व प्रसारण विभागाने जनतेच्या मागणीवरुन आता दुरदर्शनवर पुनप्रक्षेपण

शनिवार दि.२८ मार्च २०२०पासून सुरु झाली आहे.त्यामुळे ब्लॅक अ‍ॅन्ड हाईट टी.व्ही.घराघरात त्याकाळी बसणारे शेजारी,कुटुंबियातील व्यक्तिचे वय आदी अनेक आठवणींना उजाळा तर मिळाला आहेच परंतु आजही ३३ वषार्नंतरही रामायणाची क्रेझ आजही घराघरात कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे.

जेणेकरुन कोठेही गर्दी होणार नाही याची पोलीस विभागाचे अधिकारी काळजी घेतल्या जात आहे. त्यामुळेच केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाने जनतेच्या मागणीवरुन दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु करण्याचा निर्णय घेतला.जेणेकरुन

या मालिकेच्या प्रसारणदरम्यान नागरिक घरातच थांबतील व गर्दीवर एक प्रकारे नियंत्रण मिळविण्यास मदत होईल.त्यामुळे शनिवार दि. २८ मार्चपासून ही मालिका दोन भागात सुरु करण्यात आली आहे. दररोज सकाळी ९ व त्यानंतर दुसरा भाग त्याच दिवसी रात्री ९ वाजता प्रसारित केल्या जात आहे.

या मालिकेचा पहिला व दुसरा भाग आज घराघरात कुटुंबांनी एकत्र येवून पाहण्याचा लाभ घेतला असल्याचे चित्र दिसून आले. यावरुन गेल्या ३३ वर्षांपूर्वी ही मालिका दूरदर्शनवरुन प्रसारित होत होती.त्यावेळी ज्याप्रमाणे प्रेक्षकां नी या मालिकेला डोक्यावर घेतले होते.तोच प्रकार दिसून येत आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर प्रेक्षकांना शनिवारपासून रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. रामायणानंतर आता प्रेक्षकांची आणखी एक आवडती मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महाभारत या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. ही मालिका शनिवारपासून सुरू झाली असून डीडी भारती या वाहिनीवर रोज दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.रामटेक तालूक्यातील कापसे परिवार सौ शालीनी कापसे,राजू कापसे ,सौ छाया कापसे ,तेजस कापसे व तुषार कापसे महाभारत परिवारासहीत महाभारताचा आनंद घेत असून गर्दी पासून दुर टि.व्ही समोर दिसून येत आहेत..

या मालिकेचे रोज दोन भाग दाखवले जाणार आहेत.महाभारत या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. बी.आर.चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत नितीश भारद्वाज,

मुकेश खन्ना,गजेंद्र चौहान,प्रवीण कुमार,अर्जुन, पुनीत इस्सार, पंकज धीर, गुफी पेंटल आणि रुपा गांगुली यांच्या मुख्य भूमिका होत्या.आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना ख?्या नावाने नव्हे तर या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here