डेस्क न्यूज – सुरक्षित राहा,घरीच राहा आज घरी राहण्याचा ”तिसरा दिवस” घरी बसून काही केलेली कामे
मुड प्रेश करण्यासाठी…१ किलो गहू मध्ये ८७९० दाणे असतात तर उद्या तांदळाचे सांगतो,ऊ लाला ऊ लाला गाण्यात
३६ वेळा ऊ ७२ वेळा लाला येते अश्या प्रकारच्या मेसेज ने तुमच्या दिवसाची सुरुवात होते.
ताळेबंदीच्या काळात सक्तीने घरात बसायला लागल्यामुळे नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला अक्षरश: असे उधाण आले आहे. सध्या वेळचवेळ असल्यामुळे तो कसा जात नाही हे दाखवण्यासाठी सुरू असलेल्या छोटय़ा छोटय़ा मिम्सला प्रचंड लाइक्स मिळत आहेत.
करोनासारख्या जागतिक संकटाशी मुकाबला करण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वाना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढचे २१ दिवस घरात बसायला लागणार असल्यामुळे साहजिकच समाजमाध्यमांवर त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आजाराचे गांभीर्य सांगणाऱ्या अनेक पोस्ट फिरत असल्या तरी या परिस्थितीतही लोकांची करमणूक होईल, अशा पोस्टचाही धुमाकूळ सुरू आहे.