हॅपी वुमन्स तर्फे अन्नदान कार्यक्रम सुरु…कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखने हे सर्वांचे कर्तव्य…सौ दीपाली देशमुख यांचे प्रतिपादन.

मूर्तिजापुर:स्थानीक ज्ञाननर्मदा बहु्द्देशीय संस्था द्वारा संचालित हॅपी वुमन्स क्लब तर्फे रामनवमी च्या पर्वावर गरीब गरजु तथा कष्टकरी कामगार व आश्रित लोकाकरिता मोफत अन्नदानचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.

यावेळी कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखने सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत सौ दिपाली देशमुख यांनी व्यक्त केले .यावेळी सौ जया टाले, सुनीता लोडम ,डॉ वैशाली राउत ,दिपाली देशमुख उपस्थित होत्या.

सुरुवातीला पाच दिवस मोफत अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वी झाल्यावर निरंतर हा कार्यक्रम सुरु राहील अशी माहिती जया टाले यांनी दिली व गरीब लोकांना भोजन दान करण्यात आले या कार्यक्रम करिता आवश्यक ती मदत देण्याचे विचार भ्रमणध्वनीद्वारे प्रा. अमिता तिड़के व इतर सदस्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम सतत राबविने साठी सर्वानि सहकार्य करावे असे आव्हान सुनीता विष्णु लोडम यांनी केले .या कार्यक्रमासाठी हॅपी वुमन्स क्लब च्या महीलांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here