बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.
हडोळती – अख्या जगात व राज्यात कोरोना वायरस रोगाचा वाढता प्रादुर्भाव व पुणे, मुंबई, हैद्राबाद व इतर जिल्हयातून हडोळती येथे आलेल्या नागरीकामुळे कोरोनाचा संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ निजवंते , संजय मिरजगावे, रमेश पवार , वसंत पवार ( पत्रकार).अभिजित निजवंते, निवृती पोतदार, संदीप गुड्डा, सोमनाथ पवार, शरद पवार,रविराज निजवंते
यांनी मिळून वार्ड ३ , व वार्ड ४ मध्ये गुरूवारी ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ निजवंते यांनी स्वखर्चातून हायड्रोक्लोरीन व सॉनिटायझर या जंतू नाशकाची फवारणी केली ग्रामस्थांना घरी राहा, विनाकारण बाहेर फिरू नका, सुरक्षित रहा अशा सूचना ही केल्या फवारणी सोबतच ग्रामस्थामध्ये जण जागृती करत कोरोना संसर्ग जन्य परिस्थीती कशी हाताळायची व नागरिकानी
काय काळजी घेणे जरुरीचे आहे या विषयी संवाद साधला.