हडोळती पोलीसाची खाकी वर्दीतील माणुसकी…! जेवनासह मदतीचा हात…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

अहमदपुर – कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट बंद व संचार बंदीचे आदेश आहेत त्यामूळे वाहणे वाहतुक बंद आहे त्यामूळे बाहेरगावी कामासाठी गेलेल्या तरुणाचे गावाकडे येण्यासाठी आडचणी येत आहेत त्यामूळे बाहेर गावी पोटासाठी गेलेले तरुण गावाकडे कोसो मैल दुर अंतर चालत गावाकडे येत आहेत .

हडोळती येथील पथकर नाक्यावर संचार बंदी असल्यामुळे प्रशासनाने तपासणी करण्यासाठी चेक पोस्ट केले आहे हडोळती येथील पोलिस कर्मचारी सहाय्यक पो.निरीक्षक उप. विश्वास कांबळे , पो.कॉ. राजकुमार दबेटवार, कॉ. फड, पो.कॉ मारोती केंद्रे या चेक पोस्टवर बंदोबस्त बजावत असताना दोन तरुन सोलापुर येथून पायी चालत गावाकडे देगलूर येथे जात होते पोलीसांना पाहून त्या दोन तरुणाची पाचावर धारण बसली हे तरुण सोलापुर येथून देगलूर येथे पायी चालत जात असल्याचे सांगीतल्यावर व चार दिवसापासून चालत असून उपासपोटी असल्याची माहिती दिलीझाली.

पोलीसा मधील माणूसकी जागी झाली त्याच वेळी त्यांना नाक्यावर थांबवून पोलीस कर्मचाऱ्यानी घरून आणलेले जेवणाचे डब्बे त्या तरूनाना खाऊ घातला आणि त्यांना पाणी पाजूनधीर दिला .

२०० की.मी. चा चार दिवसापासून चालत केलेला प्रवास आणि हडोळती येथून देगलूर ७०ते ८० कालोमीटर पायी प्रवास गाव गाठणे मुश्कील जाणार होते त्याच वेळी दुसऱ्या वाहनातून त्यांना त्यांच्या गावाकडे त्या तरूणांना सुखरुप पाठवले

त्यामुळे या खाकी वर्दीतल्या माणूसकीचे दर्शन घडल्यामुळे त्या तरुणाचा चेहऱ्यावरचा आनंद ओसडून वाहत होता.
सहायक पो. उपनिरीक्षक विश्वास कांबळे, पो.कॉ. राजकुमार दबेटवार, पो.कॉ. फड,पो.कॉ . रामकृष्ण मगर, पो.कॉ . मारोती केंद्रे यांचे विशेष कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here