स्वामी समर्थ मंदिर अन्न छत्र सोमेश कॉलनी यांच्या कडून दररोज दोन हजार नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था…

महेंद्र गायकवाड
नांदेड
शहरातील सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर व अन्न छत्र यांच्या वतीने दररोज दोन हजार गरजु ना अत्यंत चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून अन्न पुरवल्या जात असल्यामुळे अनेक गरजवंताची सोय झाली आहे. अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी सेवक श्री सुनील शर्मा यांनी दिली.

शहरातील सोमेश कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या अन्न छत्र विभागाच्या वतीने दि. 22 मार्च 2020 पासून शहरातील गरजवंतास सात्विक अन्न पुरवठा केला जात आहे. कोरोना साथ रोग पसरण्याची भीती असल्यामुळे अन्न बनवताना या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेऊन हे अन्न बनवले जात असल्याचे श्री सुनील शर्मा यांनी सांगितले.

दररोज 200किलो तांदळाची खिचडी तर कधी भात, 150 किलो गव्हाच्या चपात्या, 100किलोची भाजी तयार करून ती चांगल्या पद्धतीने पॅक केली जात आहे. खाणाऱ्याला हे घरचे जेवण आहे असे वाटले पाहिजे अशी त्या मागची भूमिका आहे.या साठी 75सेवेकरी आपले घरचे काम आटोपून सेवा देत आहेत. शं

करराव चव्हाण शासकीय रुग्णालयात कोरोना करिता असलेले रुग्णा सोबतच इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक असे दररोज 500 जणांचे जेवण वाटप केले जाते या सोबतच श्याम नगर चा म न पा चे रुग्णालय, कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी यांच्या साठी 500डबे दिले जातात.

रेल्वे स्थानक, बाळगीर महाराज मठ, वाडिया फॅक्टरी येथील दवाखान्यात हे अन्न पुरवल्या जात आहे.
पोतराज लोकांना सहारा

शहरातील चंदासिंघ कॉर्नर च्या परिसरात पोतराज समाजाचे 50 कुटुंब अडकले आहेत या सर्वाना अन्न पुरवण्याची जबाबदारी स्वामी अन्न छत्र च्या सेवकानी घेतली असून दररोज तेथे अन्न पूरवले जात आहे.

चहा पुरवणार
कोरोना साथ रोगाचे कारणाने अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, सेवा बजावणारे पोलीस व इतर कर्मचारी यांना चहा पुरवठा करण्याची सेवा सुरु करण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here