सोलापुरात विमानतळ परिसरात फटक्यामुळे भीषण आग…आगीवर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न…

डेस्क युज – पंतप्रधान यांचा आवाहनाला सोलापुरात गाल बोट लागले असून येथील विमानतळ परिसरात मोठी भीषण आग लागली असून फटाक्यांची ठिणगी तेथील गवतावर पडल्याने आग लागली. सध्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत जीवतहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण करण्याचे अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान, मोदींनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करुनही सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले आहेत. याआधीही मोदींनी देशवासियांना थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. तेव्हाही नागरिकांनी रस्त्यावर येत मिरवणूक आणि प्रभात फेऱ्या काढल्या होत्या.

तर रवीवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here