संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात जाण्याचे IMA यवतमाळ चे आवाहन…

सचिन येवले यवतमाळ

सद्यःपरिस्थितीचा अंदाज सर्वाना आहेच पुढील २ आठवडे हे संसर्ग टाळण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आता काळजी न घेतल्यास रुग्णांचा वाढता आलेख बघता इटली आणि स्पेन सारखी वेळ कधी हि येऊ शकते. हे टाळायची सर्वस्वी जबाबदारी आपण सर्व लोकांवर आहे. सद्यपरिस्थिती मध्ये दवाखाने सुरुच आहेत आणि राहतील हि.

आज दवाखाना सुरु ठेवण्याकरिता बऱ्याच अडचणी आहेत, त्यात प्रामुख्याने PPE पर्सनल प्रोटेक्टिव किट्स, N९५ मास्क, चांगल्या दर्जाचे सॅनिटायसोर याचा अभाव, प्रयत्न करूनंही अश्या किट्स सरकार कडून पुरवण्यात येत नाहीत आणि विकत घ्यायच्या असल्यास बाजारात उपलबद्ध नाहीत. दवाखान्यातील कर्मचारी गैरहजर आहेत. जे येतात त्यांना रस्त्यावर पोलिसांची भीती आहे, काही डॉक्टर आणि नर्स यांना त्यांच्या घरमालकांनी दवाखान्यात काम करीत असाल तर घर / सोडून द्या असे सांगितले. अश्या अनन्य अडचणींसोबत काही मोजके दवाखाने सोडल्यास दवाखाने सुरूच आहेत.

आम्ही IMA यवतमाळ तर्फे सर्व वृत्तपत्र आणि सर्व प्रकारच्या मीडिया ला आणि सर्व जनतेला आवाहंन करतो कि ” अत्यावश्यक असेल तरचं दवाखान्यात जा अन्यथा जाऊ नका”.

दवाखाने हे संसर्गाचे केंद्र बिंदू होऊ नये म्हणून रुग्णांना काही काळजी घ्यावयाची आहे. ती पुढील प्रमाणे

१. अकारण दवाखान्यात गर्दी करू नये
२. दवाखान्याची फाईल दाखवून पोलिसांची दिशाभूल करू नये
३. अत्यावश्यक असल्यासच दवाखान्यात जावे
४. रुग्णासोबत शक्य असल्यास एकाच नातेवाईक असावा
५. रुग्णालयात शक्यतोवर पूर्वनियोजित वेळी च जावे
६. नेमून दिलेल्या बैठक व्यवस्थेनुसारच बसावे हुज्जत घालू नये. ती व्यवस्था social Distancing च्या हिशोबाने केलेली असते.
७. सर्दी खोकला असेल तर तत्सम तज्ञांना दाखवा , TV वरच्या बातम्या बघून खबरून जाऊन दवाखान्यात गर्दी करू नका
८. रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक मुंबई / पुणे बाहेर देशातून आले असतील तर तशी माहिती द्यावी.

आपले आपल्या सर्वांचे निरोगी राहण्याकरिता IMA नेहमीच प्रयत्नरत राहते, सद्यस्थितीमध्ये कोरोना चा संसर्ग रोखण्याचे तसेच इतर आजारांचे उपचार करतं स्वतःची तब्बेत सांभाळण्याचे आव्हान आज सर्व डॉक्टरांसमोर आहे. त्यासाठी रुग्णांनी सहकार्य करण्याचं आहे

डॉ संजीव जोशी डॉ प्रशांत कसारे
अध्यक्ष सचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here