यवतमाळ जिल्हयातील झरी येथे सध्या कोरोनामुळे बियरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहे. यायाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडले. यातील एकून 33 हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्यांने लंपास केल्या आहेत.
वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचे बियरबार आहे. काल या परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा येऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडले. आत प्रवेश केला व बारमधल्या जवळपास सर्वच माल त्यांनी उचलून नेला. यात विविध कंपनीच्या एकून 33 हजारांचा माल होता.
सकाळी बार फोडल्याचे उघडकीस येताच स्थानिक रहिवाशी ज्ञानेश्वर अरके यांनी बार मालक राहुल डफ यांना याबाबत माहिती दिली. राहुल डफ यांनी चोरीची माहिती पाटण पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.व पुडील तपास पाटण पोलिस स्टेशन ठाणेदार करीत आहे.
सचिन येवले यवतमाळ