श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर…पालकमंत्री अशोक चव्हाण

महेंद्र गायकवाड

नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाखरुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडजिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.“कोरोना”चा प्रादुर्भावरोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री अशोकचव्हाण बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणीअंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षकविजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, अधिष्ठाताचंद्रकांत मस्के, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेशकदम, डॉ. संजय कदम, डॉ. मानकर,  डॉ.दिपक गोरे, उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, श्री खडकीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, इंडियन असोसिएशनच्याअधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वयाने चर्चा करुन सर्व प्रश्न तातडीनेसोडवावीत. अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. इंडियनमेडिकल असोसिएशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेचे प्रश्न, अडी-अडचणीबाबत नांदेड जिल्हाधिकारीयांच्याकडे सादर करण्याची सुचना दिली.

कोरोना विषाणू संदर्भातील आरोग्य विभागातीलकंत्राटी पध्दतीची पदे तात्काळ भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात रुग्णांनासन्मानपूर्वक वागणूक द्यावी. नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीसप्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहनपालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.

तालुकास्तरावर रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी येत्या काळात सुविधाउपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून मास्क, वेंन्टिलिटर, औषधाचीअतिरिक्त मागणी कळवावी. डॉक्टरांना करोना आजारापासूनसंरक्षण करणाऱ्या किट या उपलब्ध करून देण्यात  याव्यात.

केंद्र सरकारने करोना आजारावर उपचार करणाऱ्याहेल्थ केअर वर्करांसाठी 50लाख रुपयाचा विमा जाहीर केला आहे. नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीनेआयसीयू मधील व्हेंटिलेटर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दवाखाना शिवाजी पुतळा नांदेड येथेकरण्यात येणाऱ्या आयसीयूमध्ये सल्ल्यासाठी उपलब्धता राहील. त्यांच्या निगराणीखाली याआयसीयूची बांधणी करण्यात येईल.

यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची मदत करण्याचे आयएमएनांदेडतर्फे जिल्हा प्रशासनास व आरोग्य विभागास सांगण्यात आले. कोरोना या आजारावरलढ्यामध्ये जर शासकीय यंत्रणा व त्यातील हेल्थ केअर वर्कर्स यांना आयएमएच्याडॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

जनतेला सुरक्षितपणे घरी रहा व अत्यंतमहत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे आणि साबणाचा वापर हा कोरोना विषाणूचासंसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सोपा व स्वस्त असा उपाय आहे. त्याचा जास्तीतजास्त वापरकरावा, असे आवाहनकरण्यात आलेले आहे.

बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येकांनी घरात प्रवेश करण्याअगोदरआपले हात स्वच्छ धुऊन घेणे गरजचे आहे आणि हाताचा चेहऱ्यावर व डोळ्यांना स्पर्श होऊदेवू नये, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here