शिवसैनिकांना धिंड प्रकरण भोवले…जिल्हा शिवसेना प्रमुखाची तुरूंगात रवानगी…

सिंदेवाही(चंद्रपूर):—
तालुक्यातील पेंढरी कोकेवाडा येथील रहिवासी जितेंद्र राऊत याने छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी व माता जिजाऊ संबंधीत टीकात्मक लिखाण मोबाईल वर टाकल्याने शिवसैनिक संतापले होते. राऊत ने सदर संबंधात माफी मागावी असे सांगत असताना सुध्दां आपला हेकेखोर पणा कायम ठेवला.

अखेर शिवसैनिकांचा राग अनावर झाल्यावर राऊतचे पेंढरी गावात दाखल होऊन त्याला बदडले. त्याचे तोंडाला काळे फासुन गळ्यात चपलांचा हार टाकून धिंड काढली. व पोलीस स्टेशन सिदेंवाही येथे जितेंद्र राऊतला पोलिसांचे स्वाधीन केले. फिर्यादी व तक्रारकर्त यांची बाजु लक्षात घेऊन दोन्ही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी राऊत अनु. जाती. चा असल्याने धिंड प्रकरण शिवसैनिकांवर भोवले. अँटा्सिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अखेर सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

त्यात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप अनिल गिहै तसेच प्रमोद उफै प्रवीण बाळक्रूष्ण पाटील, हषैद माधव कामणपल्लीवार, गणेश अंबर बहादूर सिंग ठाकुर, विकरांत विजय सहारे, प्रणय दिलीप ढोबे सर्व राह. चंद्रपूर यांचे वर अप. क्र. 172/ 2020 कलम 324,477,143,147,149 भादवी सहकलम (१) (8) 3 (1) (s) (3) (2) (v) (1) (D) (E) अनु. जाती जमाती सहकलम 135 मपोका. अन्वये सकाळी 11.52 वा. गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयात दाखल केल्यानंतर प्रमोद पाटील व विकरांत सहारे यांनी जात प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची सुटका झाली

तर इतरांना कारागृहात पाठविले असल्याची माहिती मिळाली. आरोपी राऊत याची जमानत साठी कुणीही हजर न झाल्याने त्यालाही कारागृहात पाठविले असल्याची माहिती असुन पुढील तपास उप वि. पो. अधि. यांचे मार्गदर्शनात सिदेंवाही येथील पोलीस अधि. करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here